Breaking News

सिडको वसाहतींमधील पाणीसमस्येवर आढावा बैठक

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतली आयुक्तांची भेट

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतींमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. त्या पार्श्वभूमीवर खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा या परिसरातील नगरसेवक व लोकप्रतिनिधींनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त गणेश देशमुख यांची मंगळवारी (दि. 22) भेट घेतली. पनवेल महापालिकेतील आयुक्तांच्या दालनात झालेल्या या बैठकीला स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे, अरुणा भगत, संजना कदम, नगरसेवक नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, विजय चिपळेकर, प्रकाश बिनेदार, अमर पाटील, विकास घरत, डॉ. अरुणकुमार भगत, अ‍ॅड. मनोज भुजबळ, निलेश बावीस्कर, अभिमन्यू पाटील, राजू शर्मा, तेजस कांडपिळे, नगरसेविका हेमलता गोवारी, मोनिका महानवर, नेत्रा पाटील, भाजपचे कळंबोलीतील रविनाथ पाटील, खारघर शहर सरचिटणीस किर्ती नवघरे, शिला भगत व इतर उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी पाण्याच्या प्रश्नासंदर्भात उद्भवणार्‍या समस्या आयुक्तांसमोर मांडल्या.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply