Breaking News

बिर्ला कार्बन इंडियाकडून शिक्षकांचा गौरव

चौक : प्रतिनिधी

स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर चौक शाळेत बिर्ला कार्बन कंपनीचे युनिट हेड हनुमान गुप्ता यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जयराम म्हात्रे व कांचन म्हात्रे यांच्या संगीत साथीने विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतपद्य सादर केले.

विद्या प्रसारिणी सभा चौक संचलित सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक विद्यामंदिर चौक व विद्यामंदिर सारंग शाळेतील 48 शिक्षकांचा भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. या वेळी सुवर्णा मोरे, मुकुंद वरुडे यांनी शिक्षकांतर्फे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव योगेंद्र शहा यांनी बिर्ला कंपनी राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे स्वागत करून कंपनीचे आभार मानले. या वेळी कंपनीचे मॅनेजर सचिन कंदळे, सी. एस. आर. प्रमुख लक्ष्मण मोरे, संस्थेच्या संचालिका तथा प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक श्री. भोमले, उपमुख्याध्यापिका सौ. पुजारी, पर्यवेक्षक श्री. मोळीक, डी. एस. कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल बडेकर यांनी केले, तर आभार शरद कुंभार यांनी मानले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply