Monday , February 6 2023

रोह्यात महिला बचत गटांना मार्गदर्शन

धाटाव : प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील रोठ ब्रुदुक ग्रामपंचायत आणि बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रोठ ब्रुदुक गावातील महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. बँकेचे शाखा व्यवस्थापक चित्तरंजन कुमार यांनी या शिबिरात विविध योजनांची माहिती दिली.

रोठ ब्रुदुक गावातील बचत गटांच्या महिला प्रतिनिधी या शिबिरात सहभागी झाल्या होत्या. त्यांना बँकेचे शाखा व्यवस्थापक चित्तरंजन कुमार यांनी जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, अटल पेशन योजना आदी योजनांविषयी माहिती दिली.

येत्या काही दिवसांत धाटाव पंचक्रोशीतील 30 बचत गटांतील महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी या वेळी दिली. रोठ ब्रुदुकचे सरपंच नितीन वारंगे, राजेश डाके, राजेश भगत, विलास डाके, सुशिल वारंगे, ग्रामसेविका अलका बामगुडे यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply