Breaking News

उत्पादन शुल्क विभागाची रोह्यात मोठी कारवाई

साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

रोहे : प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रोहा तालुक्यातील कोपरी व कोपरी दापोली येथील खाडी किनारी व बेटावर असलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर कारवाई करून तब्बल तीन लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार अधीक्षक किर्ती शेडगे, ठाणे उपअधीक्षक चारुदत्त हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रोहा तालुक्यातील कोपरी व कोपरी दापोली येथील खाडी किनारी व बेटावर असलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकली.

या धाडीदरम्यान एकूण चार गुन्हे दाखल झाले असून  नवसागर मिश्रित रसायन, 14 हजार लिटर हातभट्टी दारू असा एकूण तीन लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यापैकी नवसागर मिश्रीत रसायन जागीच नाश करण्यात आले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply