Breaking News

वाहतूक कोंडी उपाययोजनांचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल शहरात भेडसवणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासंदर्भात आमदार प्रशांंत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी यांची नुकतीच बैठक झाली होती. त्यानुसार वाहतूक कोंडीला आळा घालण्यासंदर्भात पोलिसांमार्फत उपाययोजना करण्यात आल्या आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर आणि आयुक्त गणेश देशमुख यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 30) महापलिकेत बैठक झाली. वाहतूक कोंडीसंदर्भात करण्यात येणार्‍या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीस महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह प्रभाग समिती ‘क’ सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, नितीन पाटील, अ‍ॅड. मनोज भुजबळ, विक्रांत पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, रूचिता लोंढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे, वाहतूक शाखेचे प्रभारी निरीक्षक श्री. नाळे, उमेश इनामदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पनवेल शहर वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्याबाबत या वेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येत असलेल्या उपायपोजनांमुळे पनवेल शहर वाहतूक कोंडीला आळा बसणार असून पनवेल शहर लवकरच वाहतूक कोंडीतून मुक्त होणार आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply