उरण : प्रतिनिधी
उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने दसरा सणाचे औचित्य साधून आपट्याच्या रोपाची लागवड केली.
विजयादशमीच्या दिवशी महाराष्ट्रात सोने म्हणून आपट्याच्या पानांची देवाण-घेवाण केली जाते. दसर्याला सोन्यासारखा मान असणारे, लुटता येणारे सोने म्हणजे आपटा ही वनस्पती उलवे परिसरातून दिवसेंदिवस दुर्मीळ होत असल्याने आपट्याचे रक्षण व संवर्धन करण्याच्याच्या उद्देशाने वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने दसर्यानिमित्त आपट्याच्या रोपाची लागवड करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. संस्थेच्या पदाधिकार्यांनी उलवे सेक्टर 24 श्री हनुमान मंदिर तलाव परिसरालगत रोपण करून दसरा साजरा केला.
सोनेरी पानांचा वनराज आपटा हा खडकाळ माळरानावरही तग धरणारा आदर्श वृक्ष आहे. औषधी गुणधर्म असलेला ह्या बहूगुणी वृक्षावर अनेक पक्ष्यांचा अधिवास असतो. त्यामुळे आपटा पर्यावरण दृष्टीने महत्त्वाचा वृक्ष आहे. भारतीय सण आणि निसर्ग यांचे अटूत नाते कायम जपण्यासाठी प्रत्येक सणांना ज्या वृक्षाची आवश्यकता आहे. त्या त्या रोपांची लागवड वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने होत असते आणि ती दरवर्षी केली जाईल, असे मत संस्थेचे अध्यक्ष करण मराडे यांनी मांडले.
या कार्यक्रमास उलवे पोलीस चौकीतील पोलिस नाईक गणेश भालेकर, हवालदार राजेश सुतार आणि वटवृक्ष सामाजिक संस्थेचे धनजंय तांबे, मनोहर चवरकर, गणेश मढवी, अनिल कांबळे आदी उपस्थित होते.