Breaking News

नवीन पनवेल परिसरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट

पनवेल : वार्ताहर

नवीन पनवेल परिसरात सोनसाखळी सुळसुळाट झाला असून दोन महिलांच्या गळ्यातील दागिने अज्ञात चोरट्यांनी खेचून ते पसार झाले आहेत. या घटनांमुळे सध्या महिला वर्गात भितीयुक्त वातावरण आहे.

नवीन पनवेल सेक्टर 15 येथील जनता किराणा स्टोअर्स येथे एक 15 वर्षीय मुलगी जात असताना तिला पाठीमागून एका व्यक्तीने जोराचा धक्का दिला. यानंतर त्याने मुलीच्या गळ्यातील 40 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन जबरीने खेचून पळून गेला. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर दुसर्‍या घटनेमध्ये नवीन पनवेल सेक्टर 12 येथे राहणारी एक गृहिणी ही तिच्या पतीचा गणेश मार्केट येथील दुकानात जेवणाचा डब्बा देण्यासाठी पायी चालत जात असताना नवीन पनवेल गार्डनच्या आतमधून जात होती. या वेळी एका व्यक्तीने त्या महिलेला जोरदार धक्का देऊन त्या महिलेच्या गळ्यात असलेले 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून घेऊन पळून गेला. याबाबत त्या महिलेने खांदेश्वर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. त्यानुसार खांदेश्वर पोलिसांनी त्या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply