Breaking News

खालापूर तहसील कर्मचारी एक, तास ठिय्या आंदोलन

खोपोली : प्रतिनिधी

जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी    खालापूर तहसील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 29) तहसील कार्यालयाच्या आवारात एक तास ठिय्या आंदोलन केले.

जुनी पेन्शन योजना, केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणारे सर्व लाभ राज्य कर्मचार्‍यांना मिळावे, पूर्वीच्या सेवेचा राजीनामा देऊन आलेल्या तसेच 2005 पूर्वी निवड झालेल्या परंतु उशिरा नियुक्ती मिळालेल्या कर्मचार्‍यांना परिभाषित पेन्शन योजना लागू करा आदी मागण्यांसाठी राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचार्‍यांचे  2018 पासून विविध मार्गाने आंदोलने सुरू आहेत. शुक्रवारी संपूर्ण राज्यात एक तास ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने घेतला होता. त्यानुसार खालापूर तहसीलदार कार्यालयासमोर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे पत्र दोन दिवस अगोदर तहसीलदार आयुब तांबोळी यांना देण्यात आले होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply