Breaking News

रयतकडून लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबीयांचा हृद्य सत्कार ; कर्तृत्व, दातृत्व आणि समाजकारणाचा गौरव

पनवेल ः प्रतिनिधी

कर्तृत्व, दातृत्व आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देत सामाजिक जाणीव व बांधिलकी जोपासणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीयांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 9) सातारा येथे कर्मवीरभूमीत समारंभपूर्वक हृद्य सत्कार करण्यात आला.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 60वा पुण्यतिथी सोहळा सातारा येथे अनेक मान्यवरांच्या आणि हजारो रयत सेवकांच्या उपस्थितीत पार पडला. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबीयांनी रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी सातत्याने भरीव मदत करून या संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच मोलाचा हातभार लावला आहे. रयत शिक्षण संस्था मातृसंस्था मानून सदैव रयतच्या विकासासाठी कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चालू शैक्षणिक वर्षात संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि खारघर येथील रयत इनक्युबेशन सेंटरच्या उभारणीसाठी एक कोटी 52 लाख 75 हजार रुपयांची देणगी दिली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी संस्थेच्या विकासासाठी 69 लाख 50 हजार रुपयांची, तसेच पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही 41 लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्याचबरोबरीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (टीआयपीएल) कंपनीने सीआरएस फंडातून एक कोटी 27 लाख रुपयांची देणगी रयत शिक्षण संस्थेला देऊन संस्थेच्या विकासात नेहमीप्रमाणे मोलाचा वाटा उचलला. त्याबद्दल पद्मभूषण कर्मवीर आण्णांच्या पुण्यतिथी सोहळ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, युवा नेते परेश ठाकूर, टीआयपीएलच्या वतीने कंपनीचे मुख्य व्यवस्थापक अनिल देशमुख, अकाऊंट विभागाचे महाव्यवस्थापक अरुण नाईक यांचा सन्मानचिन्ह देऊन हजारो रयत सेवकांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. 

या सोहळ्यास संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, माजी चेअरमन थोर विचारवंत एन. डी. पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दिलीप वळसे-पाटील, विश्वजित कदम, संस्थेचे सचिव भाऊसाहेब कराळे, उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, पेट्रॉन सदस्य लक्ष्मणशेठ पाटील, जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, विश्वनाथ कोळी यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी शरद पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची पंढरी उभारून तळागाळात शिक्षण पोहचवण्याचे काम केले असल्याचे सांगून आज शिक्षणपद्धती बदलत चालली आहे. त्यानुसार संस्थाही विद्यार्थांना सक्षम करण्याचे काम करीत असल्याचे नमूद केले. रयत शिक्षण संस्थेला जेव्हा मदतीची गरज असते, तेव्हा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर नेहमी हाकेला साद देऊन संस्थेच्या विकासासाठी सातत्याने भरीव योगदान देत असल्याचा आवर्जून उल्लेख करून त्याप्रति त्यांनी त्यांचे आभारही व्यक्त केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply