उरण : रामप्रहर वृत्त
उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मिलिंद केशव तांडेल यांची निवड झाली आहे. याबद्दल आमदार महेश बालदी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर, ट्रान्सपोर्ट सेलचे जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, जितेंद्र पाटील, विजय पाटील, योगेश पाटील, निलेश पाटील, किरण पंडित, राकेश म्हात्रे, मनीष तांडेल, भालचंद्र तांडेल, प्रभाकर म्हात्रे, उज्ज्वला पाटील, सोनल तांडेल, निशांत पाटील, नंदिनी ठाकूर, अतुल पाटील, विक्रांत पवार, चेतन पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील, मिता पंडित, हर्षाली पाटील, वनिता पाटील, रश्मी म्हात्रे आदी उपस्थित होते.