Breaking News

कामोठ्यात रस्त्यांची दुरुस्ती; भाजप नगरसेवकांचा पाठपुरावा

कामोठे : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेचे नगरसेवक नगरसेवक दिलीप पाटील आणि नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या पाठपुराव्याने कामोठ्यातील सेक्टर 11मधील कृष्णा हॉटेल ते सुषमा पाटील विद्यालय आणि सुषमा पाटील विद्यालयपासून ते सेक्टर 12 झिंगाट हॉटेलपर्यंतचा रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे. कृष्णा हॉटेल ते सुषमा पाटील विद्यालय आणि सुषमा पाटील विद्यालयपासून ते सेक्टर 12 झिंगाट हॉटेलपर्यंतचा रस्त्याची गेल्या अनेक महिन्यापासून दुरवस्था झाली होती. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे त्यात साचलेले घाणेरडे पाणी यामुळे पादचार्‍यांना या रस्त्यावर  चालले अवघड होऊन बसले होते. इतकेच नव्हे तर वाहनचालकांचीदेखील या रस्त्यावर खड्डे चुकवताना त्रेधातिरपीट उडत होती. या परिसरातील रहिवाशांकडून वारंवार होत असणार्‍या रस्ता दुरुस्तीच्या मागणीला प्रतिसाद देत नगरसेवक दिलीप पाटील आणि विजय चिपळेकर यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला. या दोन्ही नगरसेवकांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि सिडकोने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. परिसरातील रहिवाशांनी ही नगरसेवकांकडून मिळालेली दिवाळी भेट असल्याची भावना व्यक्त केली.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply