कर्जत : बातमीदार
आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 6) कर्जत तालुक्यातील बनाचीवाडीत जाऊन तेथील सर्व कुटुंबांना दिवाळी फराळ, स्टील ताट, टॉवेल, फटाके देऊन आदिवासी बांधवांसमवेत भाऊबीज साजरी केली.
संस्थेचे अध्यक्ष दादा पादीर, सचिव मधुकर ढोले, कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज अध्यक्ष भरत शिद, महिला अध्यक्षा रेवती ढोले, तसेच दत्तात्रय हिंदोळा, परशुराम दरवडा, लक्ष्मण पादीर, अर्जुन केवारी, विलास भला, बाळू ठोंबरे, लक्ष्मण उघडे, मनोहर दरवडा पदाधिकार्यांसह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.