Breaking News

पनवेल आगारातही एसटी कर्मचार्यांचा बंद

पनवेल :प्रतिनिधी

राज्यभर होणार्‍या एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचे पडसाद पनवेलमध्येही पहायला मिळाले. सोमवारी (दि. 8) पनवेल एसटी आगारात एसटी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले. सकाळच्या 40 फेर्यांपैकी एकही फेरी झाली नाही.

एसटी कर्मचार्यांचे शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासाठी राज्यभर दिवाळीपूर्वी पासून आंदोलन सुरू होते. मुंबई विभागातील संघटनेचे पदाधिकारी उपोषण करीत असताना ही कर्मचारी त्यामध्ये सामील झाले नव्हते.

दिवाळीनंतर मात्र सोमवारी सकाळी मुंबई विभागातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी आपली आगारे बंद पाडली. रायगड विभागातही बंद पाळण्यात आला आहे. त्यामुळे पनवेलहून मुंबई, ठाणा, अलिबाग, पेण व कल्याण परिसरात एकही एसटी रवाना झाली नाही.

या परिस्थितीचा फायदा काही खाजगी व बेकायदेशीर प्रवाशी वाहतूक करणार्‍यांनी घेतला.

महाडसाठी प्रत्येकी 400, माणगाव 300 तर अलिबाग 100 रुपये घेण्यात येत होते. त्यामुळे अनेकांना आपला प्रवास रद्द करावा लागला. मुंबई विभागात पनवेल आगारच 100 टक्के बंद असल्याने प्रभारी विभागीय अधिकारी वासकर यांनी पनवेलला कर्मचार्‍यांची भेट घेऊन त्यांना कामावर येण्याची विनंती केली, पण ती कर्मचार्‍यांची नाकारली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply