पनवेल : प्रतिनिधी
सभेच्या सुरूवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता बारामती हालली आहे , तिकडे माढा हाललाय, मी शिरूरमधून इकडे आलोय त्यांनी ठरवलय . आता मावळचा नंबर.. तुम्ही काय ठरवलय? असा प्रश्न त्यांनी सभेला उपस्थितांना विचारला असता सगळ्यांनी धनुष्य धनुष्य धनुष्य असा आवाज देताच मुख्यमंत्री म्हणाले तुम्ही ठरवलय मग आता मी कशाला भाषण करू.
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कामोठे येथे मंगळवार 23 एप्रिल रोजी झालेल्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या सभेला उपस्थितां मध्ये महिलांची संख्या मोठी होती. सभा मंचकाच्या समोरील उजव्या बाजूला मैदान महिलांनी भरलेले होते. या मध्ये मुस्लिम बुरखावाल्या महिला ही दिसत होत्या.
यामुळे नरेंद्र मोदींना मुस्लिम महिलांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत होते. महिलांची प्रचंड संख्या असल्याने सभा संपल्यावर पोलिसांना आयोजकां मार्फत पहिले महिलाना बाहेर पडू द्यावे असे आवाहन करावे लागले. मराठवाड्याचा नातू असलेल्या पार्थ पवारला निवडून देण्यासाठी मराठवाडा रहिवाशी संघाने आवाहन केले असले तरी खारघर मध्ये राहणार्या मराठवाड्यातील सीमा खडसे या आपल्या सोबत शंभरपेक्षा जास्त मराठवाड्यातील महिला घेऊन सभेला आल्या होत्या.
आम्ही महिला खारघरमध्ये बचत गट चालवतो. बचत गटाच्या माध्यमातून अनेक भगिनींना रोजगार मिळाला आहे. त्यासाठी आम्हाला बँके कडून विनातारण कर्ज या भाजप सरकार मुळे मिळाले त्यामुळे आज आम्ही महिला या सभेला आलो.
आम्ही मराठवाड्याचा नातू असलेल्या पार्थ पवारला मतदान करणार नाही तर मोदींचे हात बळकट करण्यासाठी सेनेच्या बाराणेंचा प्रचार करीत आहोत, अशी प्रतिक्रिया महिला बचत गट समन्वयक सीमा खडसे यानी व्यक्त केली.
सभा मंचकाच्या पुढे पोलिसांनी लोखंडी बॅरिगेटस लावल्या होत्या. त्यानंतर मीडियावाले बसले होते. सभास्थानी मुख्यमंत्री येण्यापूर्वी एक 6-7 वर्षाचा मुलगा चड्डी बनियनवर खेळत त्या बॅरिगेटसला असलेल्या दोन पाईपच्या मधून आत आला आणि गर्दी पाहून गोंधळून गेला त्याला पोलिसांनी कोणा बरोबर आला आहेस असे विचारता. गडबडून तो पुन्हा त्या दोन पाईप मधून निघून मैदानाच्या बाहेर निघून गेला आणि पोलिसांना हुश्य वाटले.