Breaking News

कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहणार

खासदार श्रीरंग बारणे यांची ग्वाही; सिंधुदुर्ग जिल्हा हितवर्धक संघाशी चर्चा

पनवेल ः वार्ताहर

पनवेल परिसरात कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा हितवर्धक संघाची महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी भेट घेतली व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन खासदारकीच्या माध्यमातून केलेल्या कामांची माहितीसुद्धा त्यांनी या वेळी दिली. आपण कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहणार, अशी ग्वाही खासदार श्रीरंग बारणे यांनी या शिष्टमंडळास दिली.

 या वेळी महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यासह पनवेलचे आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महापौर डॉ. कविता चौतमोल, गटनेते परेश ठाकूर, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, शहरप्रमुख विजय शेट्ये, उपशहरप्रमुख रूपेश ठोंबरे, किरण सोनावणे आदी उपस्थित होते. या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा हितवर्धक संघ पनवेलचे अविनाश सावंत, भाऊ परब, कालिदास कावले, प्रदीप रावले, प्रशांत खोब्रेकर, मराळ, दीपक तावडे, गणेश परब, सुरेंद्र नेमलेकर, चेंदवणकर, बाप्पा मोचेमाडकर, वासुदेव सावंत, सिंधुदुर्ग महिला आघाडीच्या प्रिता भोजने, प्रिया खोेब्रेकर, रश्मी वाघाटे, प्राची रावले, जयश्री दाभोलकर, अर्चना कुळकर्णी,  कावले, चेंदवणकर, सुरेखा पवार, टिया, गीता राणे, जया परब, अपूर्वा प्रभू आदी उपस्थित होत्या. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. या वेळी कोकणी पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply