अलिबाग : प्रतिनिधी
कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या., अलिबाग या संस्थेच्या वतीने नुकताच ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
संस्थेचे कामकाज 13 शाखांमार्फत चालते, संस्थेच्या सर्व शाखांमधून येणार्या ग्राहकांसोबत हितगुज करावे, त्यांना संस्थेकडून भविष्यात हव्या असणार्या वा अपेक्षित असणार्या सेवा याबाबत चर्चा व्हावी हाच हेतू ठेवून संस्थेने गुरुवारी (दि. 11) हा दिवस ग्राहक दिन म्हणून साजरा केला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश विष्णू तुळपुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा दिवस ग्राहक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी संस्थेचे सभासद, संचालक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या., अलिबाग ही रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून सर्वज्ञात आहे. 392 कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय असणारी कोकणातील अग्रगण्य संस्था आहे. संस्थेने विविध उपक्रमातून खूप मोठा ग्राहक वर्ग आपल्या व्यवसायामध्ये सहभागी करून घेतला आहे. या उपक्रमाला संस्थेच्या ग्राहकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. या वेळी ग्राहकांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
काही ग्राहकांनी आपल्या लिखित प्रतिक्रिया देऊन काही सूचनाही संस्थेस दिल्या आहेत. दि. 11 नोव्हेंबर हा सासवणे शाखेचा वर्धापन दिवस आहे, याचे औचित्य साधुन सासवने, आवास परिसरातील सभासद, ग्राहक यांना वाचनालयाची सुविधा प्राप्त व्हावी या उद्देशाने वाचनालयाचे ही उद्घाटन करण्यात आले. या वेळी संस्थेचे सभासद उपस्थित होते, त्यांनी या उपक्रमाबद्दल व्यवस्थापनाचे आभार मानले.