Breaking News

कामोठ्यातील मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त
छाबा फाऊंडेशनच्या वतीने कामोठे येथे 5 आणि 10 किलोमीटर मॅरेथानचे आयोजन रविवारी (दि. 14) करण्यात आले होते. ही स्पर्धा ‘रन फॉर चाईल्ड एज्युकेशन’ अर्थात बालशिक्षणसाठी जगजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून घेण्यात आली. रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानात झालेल्या या स्पर्धेस स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेचा शुभारंभ झाला.
या स्पर्धेस भाजपचे कामोठे शहराध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर, युवा नेते हॅपी सिंग, कामोठे सरचिटणीस शरद जगताप, हरजिंदर कौर, प्रभाग 12 अध्यक्ष प्रदीप भगत, छाबा फाउंडेशनचे दामोदर चव्हाण, शेखर जगताप, सचिन तांबोळी, राहुल जयस्वाल, सायली चव्हाण, बाजीराव चव्हाण, सुरेंद्र हळदीकर, अजित तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदाळे, वाहतूक शाखेचे श्री. निशिकांत, मीना यादव, दिनेश यादव, मंगेश कदम, प्रणाली कदम, आचल गुप्ता, संगीता यादव, सायली उतले, रोहित नलावडे, हर्ष भोसले, ऋषांत सावंत, राजेश पटेल, आर्यन तांबे, प्रथमेश जगताप, प्रथमेश ठाकरे, छाया चव्हाण आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, आपल्या देशाचे पंतपत्रान नरेंद्र मोदी यांनी हम फिट तो इंडिया फिट, असे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न वर्षभर सुरू असतो. छाबा फाऊंडेशने फिटनेस चॅलेंज या माध्यमातून आपली स्वत:ची परीक्षा घेण्याचा व स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन तसेच स्पर्धेचे उत्तम आयोजन केल्याबद्दल कौतुक. 

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply