Breaking News

कडावमध्ये भव्य आरोग्य शिबिर

कर्जत : प्रतिनिधी

कडाव ग्रामपंचायत आणि सुमित श्रीमाळ आयुर्वेदिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कडावमध्ये पाच दिवसांच्या  आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्याचा लाभ परिसरातील ग्रामस्थ घेत आहेत. शिबिरामध्ये आयुर्वेदिक उपचारांवर भर दिला जात असून, हे शिबिर रविवार (दि. 6)पर्यंत सुरू राहणार आहे. कडाव प्राथमिक आरोग्य केंद्रामधील या आरोग्य शिबिराचे उद्घाटन नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रमुनी मोरे, प्रमोदिनी शेट्टी, आंबिवली प्राथमिक केंद्राचे डॉ. रमेश कोकरे आदी उपस्थित होते. सुमित श्रीमाळ यांनी स्वागत केले. प्रमोदिनी शेट्टी यांनी प्रास्ताविकात शिबिराबद्दल माहिती दिली.आयुर्वेदिक औषधींचे महत्त्व संपूर्ण जगाला पटले आहे. भविष्यात पांढर्‍याकोडावर यशस्वी उपचार करण्यासाठी आम्ही येथे केंद्र उभारणार आहोत, असे सुमित श्रीमाळ यांनी या वेळी सांगितले. या आरोग्य शिबिरात मधुमेह, कुष्ठरोग, हाडांचे आजार, संसर्गजन्य रोग आदींची तपासणी होत आहे. डॉ. बिना जनवीर, डॉ. सूरज सिंग, डॉ. समीर शेख, डॉ. अमोल सातव आदी रुग्णांची तपासणी करीत आहेत. या शिबिरास परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply