कुस्ती संघाच्या सरचिटणीसपदी खोपोलीचे मारुती आडकर

खोपोली : प्रतिनिधी

येथील ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक व राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त मारुती आडकर यांची कुस्तीगीर संघाच्या विभागीय सरचिटणीसपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

मारुती आडकर यांनी क्रीडा क्षेत्रात विशेषतः तालीम व कुस्तीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मागील पाच वर्षेही ते कोकण विभागीय कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. त्यांच्या योगदान व कामाची दखल घेत पुन्हा संघटनेच्या विभागीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल खोपोली-खालापूर तालुका तालीम संघ, कुस्तीगीर संघ, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ व विविध क्रीडा क्षेत्रांतील संघटना पदाधिकर्‍यांनी आडकर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.कोकण व विशेषतः रायगड जिल्ह्यात कुस्तीपटूंना आधुनिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी व उत्कृष्ट कुस्तीपटू घडविण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे आडकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply