Breaking News

शिक्षक विजय दरेकर यांना वसंत डावखरे स्मृती पुरस्कार प्रदान

पोलादपूर : प्रतिनिधी

नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोतवाल येथील माऊली प्रशालेमध्ये माध्यमिक शिक्षक असलेल्या विजय गोपाळराव दरेकर यांना यंदाचा कोकण विभाग वसंत डावखरे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. भाजप शिक्षक आघाडीतर्फे दरवर्षी गुणवंत शिक्षकांना वसंत डावखरे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. ठाणे येथे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, प्रशांत ठाकूर, माधवी नाईक आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विजय दरेकर यांनी यंदाचा कोकण विभाग वसंत डावखरे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारला. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विजय दरेकर यांचे पोलादपूर तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply