Breaking News

राज्य आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेची पारितोषिके जाहीर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून निकाल घोषित

पनवेल : रामप्रहर वृत्त
शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 18, 19 आणि 20वी राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे निकाल श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवार (दि. 19) पनवेलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला.
सन 2018च्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत पल्लवी परुळेकर-बनसोडे यांच्या ‘अधोरेखित’ अंकाने, सन 2019च्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत रवींद्र धारिया यांच्या ‘शाश्वत वनीकरण’ आणि राम शेवडीकर यांच्या ‘उद्याचा मराठवाडा’ या अंकांनी (विभागून) तर 2020च्या राज्यस्तरीय स्पर्धेत रश्मी पदवाड-मदनकर यांच्या ‘अनलॉक’ आणि भास्कर लोंढे यांच्या ‘लोकदीप’ या अंकांनी (विभागून) प्रथम क्रमांक पटकाविले आहेत. तसेच रायगड जिल्हास्तरीय 2018च्या स्पर्धेत शारदा धुळप यांच्या ‘साहित्यआभा’, 2019च्या स्पर्धेत अपर्णा कुलकर्णी-नाडगौडी यांच्या ‘पर्ण’, तर 2020च्या स्पर्धेत दीपक म्हात्रे यांच्या ‘आगरी दर्पण’ या दिवाळी अंकांनी प्रथम क्रमांकाचा मान मिळविला आहे, अशी माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार नीलाताई उपाध्ये, स्पर्धा संयोजक दीपक म्हात्रे आदी उपस्थित होते.
राज्यस्तरीय 2018च्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक ‘चतुरंग अन्वय’, तृतीय क्रमांक ‘झपूर्झा’, सर्वोत्कृष्ट बाल दिवाळी अंक ‘वयम’, उत्कृष्ट विशेषांक ‘अ‍ॅग्रोवन’, उत्कृष्ट कथा ‘चंद्रकांत’, उत्कृष्ट व्यंगचित्र ‘हास्यधमाल’, उत्कृष्ट मुखपृष्ठ ‘दीपावली’, सन 2019च्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक (विभागून) ‘दीपावली’ आणि ‘पुरुष उवाच’, तृतीय क्रमांक (विभागून) ‘दुर्ग-शोध गडकिल्ल्यांचा’ आणि ‘दुर्गाच्या देशातून’, उत्कृष्ट विशेषांक ‘समपथिक’, उत्कृष्ट कविता ‘खोडलेली कविता-कालनिर्णय’, उत्कृष्ट व्यंगचित्र ‘दीपावली’, उत्कृष्ट मुखपृष्ठ ‘चतुरंग अन्वय’, उत्कृष्ट अंतर्गत सजावट ‘अक्षरधारा’ तर सन 2020च्या स्पर्धेत ‘संवादसेतू’ व ‘आंतर-भारती’ या अंकांना विभागून द्वितीय क्रमांक, ‘कुबेर’ व ‘ओंजळीतील अक्षरे’ या अंकांना विभागून तृतीय क्रमांक, सर्वोत्कृष्ट बाल दिवाळी अंक ‘छावा’, उत्कृष्ट विशेषांक ‘तेजोमय’, उत्कृष्ट कथा ‘पॉपी टिअर (व्यासपीठ)’, उत्कृष्ट कविता ‘सकाळ- खरवडून पाहीन म्हणते’, उत्कृष्ट व्यंगचित्र ‘आक्रोश (संजय मिस्त्री)’, उत्कृष्ट मुखपृष्ठ ‘दीपावली’, उत्कृष्ठ अंतर्गत सजावट ‘किल्ला’ या अंकांनी पटकाविला आहे. तर रायगड जिल्हास्तरीय 2018च्या स्पर्धेत ‘लोकसेवक’ अंकाने द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक ‘उरण समाचार’, सन 2019 च्या स्पर्धेत ‘उरण समाचार’ने द्वितीय, तर तृतीय क्रमांक वादळवारा अंकाने, तसेच सन 2020च्या स्पर्धेत ‘इंद्रधनु’ने तर ‘रामप्रहर’ अंकाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे, अशी माहिती देण्यात आली.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार नीलाताई उपाध्ये, अरविंद कुलकर्णी, प्रा. डॉ. दीपा ठाणेकर, महेश कुलसंगे, प्रा. नम्रता पाटील, सुनील कर्णिक, प्रा. डॉ. अलका मटकर, प्रा. जयप्रकाश लब्दे, विजय कुलकर्णी, प्रा. वर्षा माळवदे, नम्रता कडू, रामदास खरे, प्रतिष्ठा सोनटक्के यांनी काम पाहिले असून परीक्षणाचा दर्जा सातत्याने राखण्यासाठी परीक्षकांच्या परीक्षणामध्ये कोणताही हस्तक्षेप केला जात नसल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले.
राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमाकांस 75 हजार रुपये, द्वितीय क्रमाकांस 35 हजार, तर ततीय क्रमाकांस 20 हजार रुपये, तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील उत्कृष्ट कथेसाठी सात हजार रुपये, उत्कृष्ट कविता व उत्कष्ट व्यंगचित्रास प्रत्येकी 2500 रुपये, उत्कृष्ट विशेषांकास पाच हजार रुपये, उत्कृष्ट मुखपृष्ठ पाच हजार रुपये, त्याचबरोबर बालसाहित्याच्या सर्वोत्कृष्ट अंकास 7500 रुपये, तसेच रायगड जिल्ह्यातून प्रकाशित होणार्‍या दिवाळी अंकांसाठी खास पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये प्रथम क्रमांकास 30 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 15 हजार रुपये आणि तृतीय क्रमाकांस 7500 रुपये आणि सर्व पुरस्कारप्राप्त अंकांना सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप असून मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना 25 डिसेंबरला होणार्‍या सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

‘रामप्रहर’ला 2020साठीचे जिल्हास्तरीय पारितोषिक
रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत दैनिक रामप्रहरने प्रकशित केलेल्या दिवाळी अंकाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. या दिवाळी अंकात कोरोनासंदर्भात विविध विषयांना स्पर्श करण्यात आला होता.

राज्यस्तरीय

  • 18व्या स्पर्धेत ‘अधोरेखित’,
  • 19व्या स्पर्धेत ‘शाश्वत वनीकरण’ आणि ‘उद्याचा मराठवाडा’,
  • 20व्या स्पर्धेत ‘अनलॉक’ आणि ‘लोकदीप’ अंकानी प्रथम क्रमांक पटकाविले.

जिल्हास्तरीय

  • 18व्या स्पर्धेत ‘साहित्यआभा’,
  • 19व्या स्पर्धेत ‘पर्ण’,
  • 20व्या स्पर्धेत ‘आगरी दर्पण’ प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply