Breaking News

पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरू करण्यास टास्क फोर्सचा विरोध

मुंबई ः प्रतिनिधी

राज्यातील शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानंतर आता राज्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. यासाठी शालेय शिक्षण विभागही अनुकूल असल्याची माहिती समोर आली होती, मात्र कोरोना टास्क फोर्स यासाठी सध्या तयार नाहीए. टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे.

मुले जवळपास 18 महिने शाळा बाहेर आहेत आणि याच्या दुष्परिणामांची मला पूर्ण कल्पना आहे, मात्र लहान मुले कोविडला बळी पडणार नाहीत याची काळजी टास्क फोर्सला आहे. म्हणूनच पीडियाट्रिक व्हॅक्सिनेशन सुरू व्हावे यासाठी सोमवारच्या बैठकीत टास्क फोर्स राज्य सरकारला विनंती करणार आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांचे लसीकरण होत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणे योग्य ठरणार नाही, असे डॉ. संजय ओक म्हणाले.

मास्क ही पहिली लस आहे, पण सणात लोकांनी मास्क टाळला, यामुळेच तिसरी लाट येणारच नाही असे म्हणता येणार नाही.

अमेरिकेत मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण इतके वाढले की मुलांना एका राज्यातून दुसर्‍या राज्यात शिफ्ट केले जात आहे. ही परिस्थिती मला माझ्या राज्यात येऊ द्यायची नाही. तिसर्‍या लाटेचा अंदाज चुकल्याचा आनंद मला आहे, मात्र तिसरी लाट येणारच नाही असे म्हणता येणार नाही, असेही डॉ. ओक यांनी सांगून सध्या तरी पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्यास अप्रत्यक्षपणे विरोध दर्शविला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply