मुंबई : येथील विद्यापीठासह राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्यांचे विविध प्रश्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर प्रलंबित आहेत. पाठपुरावा करूनदेखील हे प्रश्न सुटत नसल्याने विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्यांच्या वतीने सोमवारी (दि. 22) राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई विद्यापीठासह राज्यातील सर्व विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयाचे कामकाज ठप्प होणार आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठीय व संलग्नित महाविद्यालयीन कर्मचार्यांच्या महासंघाच्या कृती समितीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 16 नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी एक दिवसाचा राज्यव्यापी लाक्षणिक बंद करण्यात येत आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …