Breaking News

नवी मुंबई भाजपतर्फे सफाई कामगारांचा सत्कार

नवी मुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबई महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण 2021मध्ये मिळालेल्या यशासाठी तुर्भे परिसरातील सफाई कामगारांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रामचंद्र घरत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांक तसेच सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानात देशांतर्गत द्वितीय क्रमांक व कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार तसेच वॅाटरप्लस मानांकन’ मिळाल्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष नवी मुंबईच्या वतीने तुर्भे परिसरातील मे. अमृत इंटरप्रायझेस गट क्रं 46 च्या कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. सर्व कामगारांचा शाल व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रामचंद्र घरत, जिल्हाउपाध्यक्ष संकेत डोके, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेट्टे, कमलेश भानुशाली, संतोष म्हात्रे, संतु रॉय, अमित चौथमोल व सफाई कर्मचारी सुपरवायझर अशोक तुकाराम पोष्टुरे, कृष्णा पाटील उपस्थित होते. अ‍ॅड. रामचंद्र घरत यांनी सफाई कामगारांचे आभार मानले व त्यांच्या योगादानामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेला हा सन्मान मिळाला असल्याचे प्रतिपादन केले. तसेच संकेत डोके यांनी आपल्या महापालिकेला मिळालेला हा सन्मान म्हणजे सर्व सफाईकामगार व तत्सम यंत्रणेचा सन्मान आहे व महापालिकेला मिळालेला हा सन्मान टिकवण्यासाठी आनखी जोमाने काम केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply