Breaking News

आज मुंबईत अंध महिलांची क्रिकेट स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी

क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) यांच्या सौजन्याने अनाम प्रेम संस्थेतर्फे अंध महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवारी रामलीला मैदान, मालाड पूर्व येथे होणार आहे. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) तर्फे खान्देश, मुंबई, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ अशा सहा विभागांतून अंध क्रिकेटचा विकास करत आहे. यात मुंबईचे दोन संघ सहभागी होणार आहेत.राज्यातील अंध क्रिकेट संबंधित कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सीएबीएम ही महाराष्ट्रातील एकमेव मान्यताप्राप्त संस्था आहे. क्रिकेट ऑफ असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया (सीएबीआय)च्या अंतर्गत वर्ल्ड ब्लाइंड क्रिकेट कौन्सिल (डब्ल्यूबीसी)शी संलग्न आहे. संस्थेद्वारे खेळाडूंना लागणार्‍या मूलभूत सुविधा पुरविण्याचे काम सातत्याने केले जाते. आतापर्यंत 8 आंतरराष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्राने दिले आहेत.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply