Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात देखरेख मूल्यांकन कार्यक्रम

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात नुकताच मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित केलेला देखरेख मूल्यांकन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

नवी मुंबईतील 29 महाविद्यालयांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यामध्ये 2000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रकल्प तपासून मूल्यांकन करण्यात आले. या कार्यक्रमास मुंबई विद्यापीठातर्फे प्राध्यापक डॉ. कुणाल जाधव, शुभम सोनावणे व किरण पाटील यांनी कामपाहिले. फिल्ड समन्वयक डॉ. बी. एस. पाटील व विनोद हंडुलकर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.एस. टी. गडदे यांनी सर्वांना संबोधित केले.

महाविद्यालयाच्या  पायाभूत सुविधा, व्यवस्थापन याबद्दल मुंबई विद्यापीठ विभाग प्रमुख डॉ. दिलीप पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा. मीनल मांडवे, प्रा. प्रियांका कोंडिलकर, प्रा. श्रद्धा शिंदे, प्रा. करिश्मा पाटील, प्रा. अंकिता दुबे, विद्यार्थी प्रमुख अरफात खामकर व इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे व उपप्राचार्य   शरदकुमार शहा यांचे मोलाचे  मार्गदर्शन लाभले. चेअरमन रामशेठ ठाकूर व व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांनी सर्वांचे कौतुक केले.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply