पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात जिमखाना समितीच्या वतीने मंगळवारी (दि.14) खेलो इंडिया अंतर-विद्यापीठीय कुस्तीचे निवड सामने आयोजित करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला. या सामन्यांसाठी मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मोहन अमृले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय मल्ल नामदेव बडरे, प्रकाश जाधव, आंतरराष्ट्रीय मल्ल रंगराव हरणे, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक व क्रीडा अधिकारी संदीप वांजळे उपस्थित होते. या वेळी डॉ. मोहन अमृले, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील आणि क्रीडा समन्वयक डॉ. व्ही. बी. नाईक यांनी कुस्तीदेवता हनुमान प्रतिमेचे पूजन करून क्रीडाज्योत प्रज्वलित केली व डॉ. अमृले यांनी उपस्थितांना संबोधित केले. प्रभारी प्राचार्य डॉ. पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्रा. अनिल नक्ती व खेळाडूंनी शपथ घेतली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे आयक्यूएससी समन्वयक डॉ. बी. डी. आघव, रूसा समन्वयक डॉ. शैलेश वाजेकर यांनी मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जी. एस. तन्वर, डॉ. आर. व्ही. येवले, रुपेश पावशे आणि जिमखाना समितीच्या सदस्यांनी केले, तर आभार प्रा. अजिंक्य भगत यांनी मानले. उपक्रम यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर आणि सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.