Breaking News

एनबीपीएलमध्ये नेरळ इंडियन विजेता

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुका बॉक्स केईकेत असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित नेरळ बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीगचे विजेतेपद नेरळ इंडियन्स संघाने पटकाविले. 32 व्यावसायिक संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेचे परदेशी मैदानावर आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे यंदाचे सलग तिसरे वर्ष होते. स्पर्धा लीग पद्धतीने खेळविली गेली. अंतिम सामन्यात तन्वीर शेख-मुस्तफा तांबोळी यांच्या नेरळ इंडियन्स संघाने दर्शन मोडक यांच्या दर्शू इलेव्हन संघावर बाजी मारत विजेतेपद पटकाविले. तिसरा क्रमांक डी ए कॅपिटल या दिनेश आढाव यांच्या संघाने, तर विशाल आव्हाड यांच्या नेरळ चॅलेंजर संघाने चौथा क्रमाक मिळविला. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून भूषण गवळे, उत्कृष्ट गोलंदाज अबरार शेख, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अभिषेक जाधव आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक कौस्तूभ टिल्लू यांची निवड करण्यात आली. विजेते संघ आणि उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply