पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 12) नव्या 74 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 74 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 32 व ग्रामीण 12) तालुक्यातील 44, पेण नऊ, रोहा आठ, खालापूर, कर्जत, अलिबाग प्रत्येकी तीन, उरण दोन, मुरूड व महाड तालुक्यातील एकाचा समावेश आहे. दरम्यान, नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 59,006 झाला असून, मृतांची संख्या 1614 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 56,586 जण कोरोनामुक्त झाले असून, 806 सक्रिय रुग्ण आहेत.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper