खारघर : रामप्रहर वृत्त
करिअरसाठी कोणतेही क्षेत्र निवडा, पण त्या क्षेत्रात मन लावून काम करा. म्हणजे यश तुम्हाला हमखास मिळेल, असा मोलाचा सल्ला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिला. ते खारघर येथे पदवी वितरण समारंभात बोलत होते.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शुक्रवारी (दि. 3) सन 2022-23च्या तृतीय वर्षाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या समारंभास संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ. एस.टी. गडदे, विद्यालय समिती सदस्य प्रभाकर जोशी, दीपक शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड, प्राध्यापक उपस्थित होते.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन संधी निर्माण होत आहेत. संधी आपल्या डोळ्यासमोर असते. फक्त आपल्याला तिचा शोध घेण्याची गरज असल्याचे मत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी महाविद्यालयाच्या अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल कांबळे व नीलम मोरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. अंकिता जागीड यांनी मानले.
Check Also
सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक
प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …