गव्हाण : रामप्रहर वृत्त
स्वयंम सहायता समूहांची बैठक बुधवारी (दि. 22) कोपर येथे झाली. यामध्ये गव्हाण, कोपर, शिवाजीनगर येथील 25 स्वयंम सहायता समूह सहभागी झाले होते. या वेळी बचत गटांकडून फिरता निधी 15 हजार रुपये मिळविण्यासाठी फॉर्म भरून घेतले आणि महिला स्वयंरोजगार करण्यासाठी महिलांना तयार करण्यात आले. या बैठकीत पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांना शासकीय योजना तसेच उपजीविकेबद्दल उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. या वेळी प्रभाग समन्वयक समीक्षा गोसावी, सीआरपी मनीषा घरत आदी उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे विविध स्वयंम सहायता समूहाच्या सीमा देशमुख, विनिता देशमुख, सुरेखा कोळी, संगीता कोळी, गीता ठाकूर, सुप्रिया म्हात्रे, नयना ठाकूर, पुष्पलता, रत्नप्रभा घरत, दीपिका घरत, मनीषा ठाकूर, श्रद्धा ठाकूर आदी महिला हजर होत्या.