Breaking News

मावळच्या विकासासाठी बारणे पुन्हा खासदार बनणे काळाची गरज

जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचे प्रतिपादन

पनवेल : वार्ताहर : मावळ मतदारसंघाच्या विकासासाठी तसेच लोकाभिमुख कार्यकुशल नेतृत्वासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना प्रचंड मतांनी पुन्हा एकदा विजयी करून खासदार बनविणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता प्रयत्न करीत असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे मत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी व्यक्त केले.

प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये घराघरांत जाऊन परिचयपत्रकांसह स्लीप वाटण्याचे काम सुरू झाले आहे. यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आघाडी घेतली असून कोणत्याही परिस्थितीत श्रीरंग आप्पा बारणे यांना विजयी करायचे व धनुष्यबाण पुन्हा मावळमध्ये फडकवायचा, असा निर्धार त्यांनी केला आहे. कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. रात्र वैर्‍याची आहे. विरोधक आता साम, दाम, दंड, भेदचा वापर करून महायुतीची असलेली एकजूट फोडण्याचा प्रयत्न करतील. यासाठी विविध आमिषे दाखवतील, परंतु या आमिषांना बळी न पडता मावळच्या विकासासाठी पुन्हा एकदा

श्रीरंग बारणे यांना विजयी करणे गरजेचे असल्याने प्रत्येकाने घराघरात जाऊन धनुष्यबाणाचा प्रचार करावा, असे आवाहन या वेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply