पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप पनवेल शहर मंडल व युवा मोर्चाच्या वतीने पूर्व पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि. 25) सुशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पनवेलच्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कविता वाचन व सत्कार समारंभ, व्याख्यान, ई-श्रमिक कार्डचे वाटप असे विविध कार्यक्रम या वेळी झाले. भाजपसाठी योगदान देणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेच्या श्रेष्ठ व ज्येष्ठ पदाधिकार्यांचे सत्कार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये भाजप ज्येष्ठ नेते विजय भिडे, मकरंद निमकर, नंदा ओझे, श्रीनंद पटवर्धन, संजय गुरुजी, शेखर देशमुख, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांचा सत्कार करण्यात आला. मुग्धा दातार हिने कविता वाचन केले. सुशासन दिनाचे व्याख्यान भाजप नेते बाळासाहेब पाटील यांनी दिले. मान्यवरांच्या हस्ते ई-श्रमिक कार्डचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष वर्षा नाईक, नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, नगरसेविका चारुशीला घरत, सीता पाटील, रूचिता लोंढे, ज्येष्ठ कार्यकर्त्या सुवासिनी केकाणे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, शहराध्यक्ष रोहित जगताप, अमरिश मोकल आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.