Breaking News

घोटाळेबाज नेत्यांचा निकाल लावणार; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : प्रतिनिधी

घोटाळ्यांचे आरोप करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकारला आव्हान दिले आहे. घोटाळेमुक्त महाराष्ट्र सरकार, असा संकल्प सोमय्या यांनी नववर्षानिमित्त केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना, 2022 मधील संकल्प काय असेल हे ट्विट केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे. माफिया सेनामुक्त मुंबई महापालिका करणार आणि घोटाळेमुक्त महाराष्ट्र सरकार करणार असल्याचा संकल्प करत त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज नेते, ज्यांची चौकशी सुरू आहे, त्यांचा निकाल लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची आणि मंत्र्यांची थेट नावे घेतली. परिवहन मंत्री अनिल परब, भावना गवळी, आनंद अडसूळ, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक आणि अजित पवार यांच्यावर सोमय्या यांनी निशाणा साधला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. करोना काळात शिवसेनेने भ्रष्टाचाराचा जागतिक रेकॉर्ड केला, असे ते म्हणाले होते. डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आरोप करत, आणखी काही मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणार आहे, असा इशारा त्यांनी दिला होता.

भातखळकरांचे मलिकांना प्रत्युत्तर

मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच एनसीबी आणि भाजप नेत्यांवर आरोपांची मालिका सुरू ठेवलीय. मलिक यांनी रविवारी (दि. 2) पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांना मुदतवाढ मिळवून देण्यासाठी भाजपचा एक मोठा नेते प्रयत्नशील असल्याचा आरोप केला. मलिकांच्या या आरोपाला आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. केंद्रात लॉबिंग करून पोस्टिंग करायला किंवा मिळवायला ही काय महाभकास आघाडी आहे काय, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply