Breaking News

तुमचा आमच्यावर भरवसा नाय का?

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना सवाल

कर्जत : बातमीदार

मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत तालुक्यात बाहेरून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक निरीक्षकांनी स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता मतदारांना भेटण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्यावर भरवसा नाय का, असा सवाल करू लागले होते.

पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस उमेश पाटील, प्रमोद हिंदुराव व आशिष दामले हे निरीक्षक कर्जत तालुक्यात फिरू लागले होते. त्या वेळी कार्यकर्त्यांनी आमदार सुरेश लाड यांच्याकडे विचारणा केली, मात्र कार्यवाही झाली नाही. हे निरीक्षक आता थेट मतदारांच्या घरी जात असल्याने आमची गरज काय, असा प्रश्न कार्यकर्ते करू लागले आहेत. निरीक्षक हे स्थानिकांना डावलून मतदारांच्या गाठीभेटी घेत असल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे पवारांचे निरीक्षकांचे जाळे त्यांच्यावरच उलटण्याची चिन्हे आहेत.

सहकारी पक्षही नाराज

कर्जत तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांत डेरा मांडून बसून राहिलेल्या या निरीक्षकांवर अन्य सहकारी पक्षांशी जवळीक साधण्याचीही जबाबदारी देण्यात आल्याची माहिती समोर आली, पण काँग्रेसची नाराजी अद्याप पूर्णपणे दूर करण्यात निरीक्षक यशस्वी ठरले नसल्याचे बोलले जाते; तर बाहेर राहून मदत करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रत्यक्ष प्रचारात उतरल्यानंतरदेखील रसद मिळत नसल्याने मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी आपली नाराजी बोलून दाखविली आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply