पनवेल : रामप्रहर वृत्त
येथे श्वान नियंत्रण केंद्र चालविणार्या आडीए (खप ऊशषशपीश ेष अपळारश्री, खपवळर) या संस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रभाग समिती ‘ड’ सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगरसेविका सुशीला घरत उपस्थित होते. त्यांनी शुभेच्छा देताना ‘आयडीए’ या प्राणी सेवाभावी संस्थेच्या निस्पृह कार्याचे, तसेच डॉक्टर्स व कर्मचार्यांचे कौतुक करून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे अभिवचन दिले. या कार्यक्रमात संस्थेचे विश्वस्त डॉ. एच. जी. घनवट यांनी संस्थेच्या कार्याची इत्थंभूत माहिती देऊन मागण्यांचे निवेदन महापौरांकडे दिले. या वेळी डॉ. अमेय तांडेल, डॉ. अंकुर मोकल, डॉ. छाया शिरसाट, रावसाहेब खरात, राहुल वाहुळकर, विनोद जोशी, बाळा पाटील, जादूगार शिंदे, संदेश जाधव, प्रकाश सोनावळे, विजय रंगारे, संजय कांबळे, गोपीनाथ लोखंडे, स्मिता साळवी, गायक मीनाकुमारी, नयना कांबळे, वैशाली घाग आदी उपस्थित होते. त्याचबरोबर व्यवस्थापक शैलेश सावंत, सुपरवायझर रोहित कदम, लहू निमजे, संदेश सावंत, अविनाश कांबळे, सुमित कदम, कल्पेश कदम, वैभव मोहिते, साहिल कदम, अशिष कदम आदी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार पत्रकार श्याम साळवी यांनी केले.