Breaking News

विविध मागण्यांसाठी भाजपची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांशी चर्चा

माथेरान : प्रतिनिधी

एप्रिल व मे महिन्याच्या ऐन पर्यटन हंगामात पाण्याची कमतरता भासू नये आणि शारलोट लेकमधील पाण्याचा उपसा करण्यात येऊ नये या सर्वांचे नियेजन आतापासून करण्यात यावे या मागणीसाठी नवीन पनवेलचे कार्यकारी अभियंता सूर्यवंशी व कर्जतच्या उपविभागीय अधिकारी कंटे मॅडम यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.

माथेरान हे दुर्गम भागात येत असल्याने माथेरानसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा कायमस्वरूपी शाखा अधिकारी असावा, तसेच या वेळी पाण्याच्या बाकी राहिलेल्या नळजोडण्या लवकरात लवकर पूर्ण करून खोदलेले रस्ते पूर्ववत करावे. सध्या माथेरान शहरातील पर्यटन व्यवसाय  संपूर्ण ठप्प असल्याने थकबाकी वसुली करू नये, तसेच शहरातील थकबाकी वसुली होण्याकरिता निर्भय योजना लवकरात लवकर अमलात आणावी, अशा अन्य मागण्याही या वेळी करण्यात आल्या. या वेळी भाजप शहराध्यक्ष प्रवीण सकपाळ, सरचिटणीस राजेश चौधरी, माझी नगरसेवक चंद्रकांत जाधव, प्रदीप घावरे, संदीप कदम, राकेश चौधरी व दीपक शहा आदी उपस्थित होते.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply