Breaking News

शेडाशी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे सतीश कदम विजयी

पेण : प्रतिनिधी

पेण तालुक्यातील शेडाशी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण एक जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असून सतीश रामचंद्र कदम यांना 228 मते मिळून ते विजयी झाले आहेत.

शेडाशी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण जागेसाठी प्रभाग तीनमधील पोटनिवडणुकीसाठी त्या प्रभागात भाजप, शिवसेना आणि अपक्ष असे तीन उमेदवार रिंगणात उभे होते. यामध्ये भाजपचे सतीश रामचंद्र कदम विजयी झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी घोषित केले.

या वेळी बोलतांना सरपंच प्रकाश कदम म्हणाले की, आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून गावात अनेक विकासात्मक कामे केली असून जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार आहे. याहीपेक्षा अधिक विकासकामे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सतीस कदम यांचे आमदार रविशेठ पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी अभिनंदन केले. या वेळी लक्ष्मण पाडुरंग पवार, कोंडिबा पवार, पांडुरंग पवार, विश्वास पवार, सूर्यकांत जाधव, सखाराम कदम, कोडिंबा पवार, धोडिंबा पवार, रमेश पवार, रंजित पवार आदी उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply