Breaking News

भाजयुमोतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

खारघर : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता युवा मोर्चा खारघर मंडलचे अध्यक्ष विनोद घरत यांच्या कार्यालयात आझाद हिंद सेनेचे संस्थापक, प्रखर राष्ट्रभक्त, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 125व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पदाधिकार्‍यांनी मानवंदना दिली.

या वेळी नेताजींच्या जयंतीनिमित्त भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांचे मोलाचे विचार व्हिडीओ लाईव्हद्वारे युवा पदाधिकारी यांनी ऐकले. युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, युवा उपाध्यक्ष पप्पू खामकर, प्रमोद पाटील, अमोल सुतार, प्रभाग क्रमांक 3 महिला मोर्चा अध्यक्ष सरिता जाधव, जयश्री सूर्यवंशी, प्रीती दिघे, नूतन डांगळे, बबिता कसबे, सरोजिनी नायर आदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply