Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली तलाव बांधकामाची पाहाणी

खारघर : रामप्रहर वृत्त

येथे सेक्टर 15मध्ये पनवेल महापालिकेच्या वतीने तलाव बांधण्याचे काम सुरू असून या कामाची पाहाणी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी करून आढावा घेतला, तसेच अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पनवेल महापलिकेच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्यानुसार खारघर सेक्टर 15 मध्ये तलावाचे बांधकाम सुरू आहे. या तलावाजवळ छट्पूजेसाठी आणि गणपती विर्सजनासाठी व्यवस्था होत आहे, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि गार्डन सुरू करण्यात येणार आहे. या सुरू असलेल्या कामाची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाहणी केली. या वेळी स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर, प्रभाग समिती ‘अ’ सभापती संजना कदम, नगरसेवक निलेश बाविस्कर, भाजप नेते समीर कदम, मुकेश गर्द, बबिता मॅडम, बुथ अध्यक्ष विश्वनाथ एन. डी., मोहन भुजवडकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे मार्तंड सोनावणे, महापलिकेचे जाने साहेब आणि फोटरेज गु्रपचे सदस्य उपस्थित होते. या वेळी परेश ठाकूर यांनी तलावाचे काम वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने होत असल्याचे सांगितले.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply