खारघर : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका, दुर्गामाता फेरीवाला संस्था, खारघर डॉक्टर असोसिएशन व खारघर साऊथ इंडियन सेलच्या वतीने ‘महारक्तदान शिबिर’ आणि लसीकरण शिबिर बुधवारी (दि. 26 जानेवारी) होणार आहे. या शिबिराचे पनवेल महापालिकेचे नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या तयारीच्या कामाचा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 25) आढावा घेतला. खारघर सेक्टर 15 मधील सुवर्णगंगा ज्वेलर्स येथे सकाळी 10 वाजता हे शिबिर होणार असून, 15 वर्षावरील मुलांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात होणार आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या कोविड योद्धे व नागरिकांना श्रद्धांलजी देण्यात येणार आहे. या शिबिराच्या पूर्वतयारीच्या कामाचा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आढावा घेतला आणि सूचना दिल्या, तसेच या वेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपस्थित लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी आणि स्वच्छता दूतांनी प्रतिज्ञा घेऊन लोकशाही मजबूत करण्याचा संकल्प घेतला. या वेळी स्थायी समिती सभापती अॅड. नरेश ठाकूर, निलेश बाविस्कर, प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती संजना कदम, भाजप नेते समीर कदम, मुकेश गर्द, बुथ अध्यक्ष विश्वनाथ एन. डी., मोहन भुजवडकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे मार्तंड सोनावणे, बबिता मॅडम, महापालिकेचे अधिकारी जाने साहेब आदी उपस्थित होते.