Saturday , June 3 2023
Breaking News

मुरूडमध्ये रंगली नौकानयन स्पर्धा; उत्तम प्रतिसाद

मुरूड : प्रतिनिधी

राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त मंगळवारी (दि. 25) तहसीलदार रोहन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुरूड-राजपुरी समुद्रात नौकानयन स्पर्धा घेण्यात आली. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नौकानयन स्पर्धाचे घेण्यात आल्याचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी या वेळी सांगितले. तहसीलदार रोहन शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर नौकानयन स्पर्धेला सुरवात झाली.  जंजिरा पर्यटक सहकारी संस्था राजपुरी या संस्थेच्या सुलतानी, सुभानी, लक्ष्मी- 2, रहेमानी, महराबा, दिलबरी, सलामती, लक्ष्मी-1, नुरानी, अकबरी, लासानी, रब्बानी, इब्रानी, दस्तगिरी या 13 नौकामालकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. निवडणूक नायब तहसीलदार अमीत पुरी, नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, मंडळ अधिकारी विजय मापुस्कर, तलाठी रेवसकर, नियाज कादिरी, शाहनवाज डॉक्टर, इस्माईल आदमने आदिंसह नौकामालक या वेळी उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply