लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह कला दिग्दर्शक नितीन देसाई, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे, ब्रँड अॅम्बेसिडर ओमकार भोजने यांची लाभणार उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी 28 ते 30 जानेवारीपर्यंत पनवेलमध्ये होणार आहे.
कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करून पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महाअंतिम फेरी होणार असून कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. महाअंतिम फेरीचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 28), तर पारितोषिक वितरण रविवारी (दि. 30) होणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या स्पर्धेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, तर पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
या वेळी सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते विजय केंकरे, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, सुप्रसिद्ध लेखक व अभिनेता संजय मोने, सुप्रसिद्ध लेखक डॉ. नितीन आरेकर, सुप्रसिद्ध अभिनेता भरत सावले, सुप्रसिद्ध उद्योजक विलास कोठारी, स्पर्धेचे ब्रँड अॅम्बेसिडर सुप्रसिद्ध अभिनेते ओमकार भोजने यांची उपस्थिती असणार आहे.
मराठी रंगभूमीला समृद्ध करणार्या मान्यवर व्यक्तींचा या वर्षीपासून जीवन गौरव स्वरूपात ’गौरव रंगभूमीचा’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असून यंदा पहिल्या पुरस्काराने ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धीसागर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 50 हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे स्वरूप पुरस्काराचे असणार आहे, तर स्पर्धेतील प्रथम क्रमांकास एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचा नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष व महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्पर्धा सचिव श्यामनाथ पुंडे, सीकेटी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. के. पाटील यांनी केले आहे.
नाट्यचळवळ वृद्धींगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा अविरतपणे पुढे चालत राहावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष व महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकीका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व नेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आला आहे.
आतापर्यंत झालेल्या या स्पर्धेला रमेश सिप्पी, प्रेमानंद गज्वी, गंगाराम गव्हाणकर, जयंत सावरकर, जयवंत वाडकर, केदार शिंदे, अंकुश चौधरी, जयवंत वाडकर, आदिती सारंगधर, किरण जुनेजा, प्रदीप मुळे, राजन ताम्हणे, समीर खांडेकर, राजन भिसे, शर्वाणी पिल्ले, क्रांती रेडकर, विजय चव्हाण, विजय कदम, विजू खोटे, अविनाश खर्शीकर, संजय नार्वेकर, ऋतुजा देशमुख, मनोज जोशी अशा नाट्य व सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले आहे.
या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि., तर सहप्रायोजक नील ग्रुप आहे.
अशी आहेत पारितोषिके
प्रथम क्रमांक एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय क्रमांक 50 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक 25 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक 10 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ एकूण दोन बक्षिसे प्रत्येकी पाच हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह.
सर्वोत्कृष्ट अभिनेता (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक 01 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कृष्ट लेखक (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कृष्ट संगीत (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कृष्ट नेपथ्य (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना (वैयक्तिक)
प्रथम क्रमांक दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक एक हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
रायगड जिल्हा प्राथमिक फेरीकरिता विशेष पारितोषिके
प्रथम क्रमांक 10 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक सात हजार 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक पाच हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
अंतिम फेरीकरिता विशेष पारितोषिके
सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका, महाराष्ट्रातील अस्सल मायबोली एकांकिका, लोककलेवर आधारित एकांकिका, सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार व बाल कलाकार यांनाही विशेष पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
तीन दिवसांत सादर होणार्या एकांकिका
सेल नसलेला रेडिओ (नूतन मराठा कॉलेज, जळगाव), पहाटेचा मृत्यू (अंभृणी सेवा संस्था, नागपूर), सूर्याची सलामी (व्हीएमव्ही कॉलेज, नागपूर), माझी बाजू माझा पक्ष (डॉ. विठ्ठलराव खोब्रागडे शिक्षण संस्था, नागपूर), स. न. वि. वि. (देवल क्लब, कोल्हापूर), विषाद (रंगपंढरी, पुणे), आय ऍग्री टू (आमचे आम्ही पुणे, पुणे), चिऊताई चिऊताई दार उघड (स्पॉट लाईट पनवेल, पुणे), त्रिशंकू (कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय उरण, रायगड), गुज (फ्रायडे, अलिबाग, रायगड), पार्वती सदन- 105 अ, ब, क (सी. के. ठाकूर स्वायत्त महाविद्यालय, रायगड) हायब्रीड (ऍबस्ट्रॅक्ट थिएटर, मुंबई), मानलेली गर्लफ्रेंड (इंद्रधनू, मुंबई), साबण (मृदा, कल्याण), राकस (कलासक्त, मुंबई), प्रसाद (रुईया कॉलेज, मुंबई), बेकलाइटी बेकलाइटी (मिथक, मुंबई), जनावर (प्राण, मुंबई), ए वन (माध्यम कलामंच, मुंबई), मौनांतर (नागाबादेवी कलामंच, वसई), व्हेन सुमेध मिट्स राधिका (फोर्थ वॉल, ठाणे) बिलिमारो (ढ मंडळी, कुडाळ), मनस्वीनी (निर्माती, वसई), तिडीक (प्रमुख थिएटर्स, मुंबई), लेखक (कल्लाकार्स थिएटर, ठाणे).