Saturday , June 3 2023
Breaking News

जिथे एक कमळ फुलते, तिथे अनेक कमळे फुलतात -दरेकर; पोलादपूरच्या नगरसेविका अंकिता जांभळेकर यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा

पोलादपूर : प्रतिनिधी

नगरपंचायत पोलादपूरच्या दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने चंचूप्रवेश केल्याची चर्चा होत असली तरी नगरसेविका अंकिता जांभळेकर यांच्या पाठिशी संपूर्ण राज्य आणि केंद्रातील भाजप ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या अंकिता जांभळेकर निवडून आल्या. या ठिकाणी भाजपचे कमळ फुलल्याच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित नगरसेविका अंकिता जांभळेकर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्यावेळी फडणवीस यांनी जांभळेकर यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी, पोलादपूर नगरपंचायतीमध्ये प्रथमच कमळ फुलले असून जिथे एक कमळ फुलते तिथे अनेक कमळे फुलतात, असे सुतोवाच केले. भाजपचे पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश निकम, अनिल खेडेकर, राकेश गोसावी आदी उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply