Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘जलयुक्त शिवार’ला क्लीन चीट

मुंबई ः प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील अनियमिततेची चौकशी करण्याची घोषणा केली होती, परंतु या चौकशीत ‘जलयुक्त शिवार’ला क्लिन चिट दिली जात आहे.
जलयुक्त शिवार अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्र आणि उत्पन्नात वाढ झाली तसेच शेतकर्‍यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा झाली, असा निष्कर्ष राज्य सरकारच्या जलसंधारण विभागाने आपल्या अहवालात काढला आहे. योजनेत अनियमितता झाल्याचा आक्षेप कॅटच्या अहवालात घेतला गेला होता. आता या योजनेतील 58 हजारांपेक्षा जास्त झालेल्या कामांचा आढावा घेऊन कॅटचा अहवालात करण्यात आलेला हा आक्षेप फेटाळण्यात आला आहे.
कॅटने या अभियानात तांत्रिक त्रुटी होत्या तसेच कामात अनियमितता होती, अशे ताशेरे ओढले होते. या योजनेचे जे उद्दिष्ट होते ते पूर्ण झाले नाही, असेही अहवालात म्हटले होते, मात्र आघाडी सरकारच्या जलसंधारण विभागाने कॅगचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केलेल्या कामांमुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचनाची सुविधा निर्माण झाली. पाणी पातळी वाढली आणि कामाची पारदर्शक अंमलबजावणी झाली, असे जलसंधारण विभागाने आपल्या अहवालात म्हटले आहे.
सत्याचाच विजय होतो!’
जलयुक्त शिवारला क्लीन चिट देण्यात आल्यानंतर भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्याचाच विजय होतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या ठिकाणी झालेल्या त्रुटीच्या आधारे संपूर्ण योजनेला नाव ठेवणे चुकीचे आहे. तेच ठाकरे सरकारने केले. हे सरकार बदनामीचे काम खूप चांगल्या रितीने करते, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

जलयुक्त शिवार अभियानावर टीकाकारांनी टीका केली होती, पण आता सरकारने स्वत:च उत्तर दिलंय. चुकीच्या गोष्टीचे मी समर्थन करणार नाही, पण त्यासाठी संपूर्ण योजनेला बदनाम करणे चुकीचे होईल.
 –देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply