Breaking News

नडोदे शाळेत विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

कर्जत ः बातमीदार

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील बांधिलकी संस्थेकडून रायगड जिल्हा परिषदेच्या नडोदे शाळेतील 39 शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कामेरकर तसेच सहकार्‍यांच्या माध्यमातून आणि कर्जत तालुक्यातील भागुचीवाडी शाळेचे शिक्षक हरिचंद्र आढारी यांच्या विशेष प्रयत्नाने रायगड जिल्हा परिषदेच्या नडोदे येथील शाळेतील 39 शालेय विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकला वही यांसह खाऊचे वाटप करण्यात आले.

या वेळी सामाजिक बांधिलकी नालासोपारा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कामेरकर, सुनील इंदप, शिल्पा इंदप, शेखर पेणकर, ओमी ढेकले, प्रियंका थोतम, हरिचंद्र आढारी आदी उपस्थित होते.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply