Breaking News

कर्जतची खुशी पुन्हा झळकणार चित्रपटात

कर्जत : प्रतिनिधी
कर्जतमधील चिमुरडी कलाकार खुशी हजारे ही ‘आपडी थापडी‘ या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेच्या मुलीची भूमिका ती साकारणार आहे. खुशीने यापूर्वी बालकलाकार म्हणून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनसोबत काम केलेले आहे.
श्रेयस तळपदेने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आगामी चित्रपटाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. बर्‍याच कालावधीनंतर श्रेयस मराठी चित्रपटसृष्टीकडे वळलेला पाहायला मिळाला. त्याने साकारलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या प्रेक्षकांची विशेष दाद मिळवताना दिसत आहे. लवकरच श्रेयस ‘आपडी थापडी‘ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करण्यात आले असून श्रेयससोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
आपडी थापडी चित्रपटाचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या समोर आला आहे. यात संदीप पाठक, नंदू माधव, नवीन प्रभाकर हे कलाकारसुद्धा महत्त्वाची बजावताना दिसणार आहेत. या चित्रपटात कर्जतची खुशी हजारे मुक्ता बर्वे आणि श्रेयस तळपदे यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. खुशीने याआधी विकी कौशलसोबत ‘भूत’ , ऐश्वर्या रायसोबत ‘सरबजीत’, खानदानी शफाखाना असे बॉलीवूड चित्रपटांत बालकलाकार म्हणून अभिनय केला आहे, तसेच वजनदार आणि प्रवास या मराठी चित्रपटातदेखील ती झळकली आहे.
चित्रपटासोबतच खुशीने टीव्ही जाहिरात क्षेत्रातदेखील काम केले आहे. खूप लहान असतानाच खुशीने पॅम्पर्स पॅन्टच्या अ‍ॅडमध्ये काम केले होते. ही तिची पहिली जाहिरात ठरली. गोल्डी गुलाबजाम, लेन्सकार्ट तसेच नुकतीच ब्रिटानिया गुड्डेची एक नवी अ‍ॅड टीव्हीवर पाहायला मिळाली. या अ‍ॅडमध्ये खुशीदेखील झळकली आहे. त्यामुळे खुशी एक बालकलाकार म्हणून बॉलीवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीत चांगलीच ओळखली जाऊ लागली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply