Breaking News

पेण कोळीवाड्यात नाखवा, नाखविण पुतळ्याचे अनावरण

पेण : प्रतिनिधी

येथील कोळीवाडा चौकात कोळी समाजाचे प्रतिक असणार्‍या नाखवा आणि नाखविण यांच्या पुतळ्यांचे अनावरण समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. पेण शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह कासार तलाव येथे साई मंदिर, कवंडाळ तलाव, मोतीराम तलाव येथील सुशोभीकरण, म्हाडा कॉलनी येथील थीम पार्क यामुळे शहराला वेगळे रूप मिळाले आहे. आता शहरातील कोळी समाजाच्या वतीने एकत्र येत स्वखर्चाने कोळीवाडा चौकात नाखवा आणि नाखविन यांची प्रतिकृती असणारा पुतळा उभारला आहे. हा पुतळा पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिक येत आहेत. हे स्थळ विशेष सेल्फी पॉईंट बनले आहे.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply