Breaking News

नागरिकांच्या सतर्कतेमुळे झाडाला जीवदान

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहराजवळ असलेल्या एका झाडाला मंगळवारी (दि. 1) सकाळी अचानकपणे आग लागली होती, परंतु तेथून जात असलेल्या डॉ. अदिती भागवत यांनी झाड पेटलेले बघून अग्निशमन बोलाविले. अग्निशमन दलाने झाडावरील आगीवर नियंत्रण मिळवल्याने त्या झाडाला जीवदान मिळाले आहे. पंचमुखी हनुमान मंदीराजवळील भारत हॉटेलसमोर असलेल्या एका भेंडीच्या झाडाला मंगळवारी आग लागली होती. या वेळी डॉ. अदिती भागवत या तेथून जाताना त्यांनी ते झाड पेटलेले बघून तत्काळ अग्नीशमन दलाला फोन केला. दरम्यान, काही इतर सतर्क नागरिकही त्यांच्या परीने बाटलीतील पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न करत होते, पण आग भडकू लागली व झाड आगीच्या भक्षस्थानी पडत होते. अग्नीशमन दल वेळेवर पोहचले व त्यांनी पाण्याचे फवारे मारून आग विझवली. त्यामुळे सध्यातरी हे झाड बचावलेल्या स्थितीत असून डॉ. अदिती भागवत यांच्या सतर्कतेमुळे त्याला जीवदान मिळाले आहे.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply