मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी (दि. 2) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. याबाबत त्यांचे पुत्र अजिंक्य देव यांनी माहिती दिली. रमेश देव यांनी अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. हिंदीत चित्रपटांतही त्यांनी काम केले. काही जाहिरातीही केल्या. नायक आणि खलनायक अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारून त्यांनी एक काळ गाजवला. चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. अखेरपर्यंत ते कार्यरत होते. मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल सिनेसृष्टीत शोक व्यक्त होत असून कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …